स्वओळख


शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड

संचलीत

उत्कर्ष मंदिर

“ शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड ” या संस्थेची स्थापना दि. ३ जून १९५६ रोजी मालाड मुंबई क्र.४०००६४ येथे झाली. तत्पूर्वी मालाड येथील एन.एल.हायस्कूल मध्ये मराठी माध्यमातून वर्ग चालविले जात होते आणि त्यामध्ये मराठी मुलांची सोय होत असे. परंतु इ.सन १९५५ साली हे वर्ग अचानक बंद करण्याचा निर्णय एन.एल. हायस्कूलच्या संस्थाचालकांनी घेतला व मराठी माध्यम वर्ग बंद करून पूढील विदयार्थीपुढे कठीण समस्या निर्माण केली.

अशा परिस्थितीत मालाडमधील काही प्रतिष्ठित मंडळींनी हे आव्हान स्वीकारून मालाडमधील मराठी विदयार्थीसाठी शालेय शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचे निश्चीत केले. या उपक्रमाची शुभारंभ म्हणून प्रथम मालाड पूर्व येथील नेचर कुरियर इन्स्टिट्यूटच्या तीन खोल्यामधून इ.५वी ते ९वी चे वर्ग १९५५ पासून सुरु केले. यासाठी प्रामुख्याने डॉ.वसंत निंबळ जोशी व श्री.मंगेश रघुनाथ राजाध्यक्ष यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर श्री.भास्करराव देवल, डॉ.आ.वि.फडके, श्री.अ.ना.भुलेस्कार, डॉ.ह.मि.जोगळेकर, श्री.वि.वि.कोठारे आदि मंडळांनी एकत्र येऊन शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रचण्याचे ठरवून कामाला सुरुवात केली व “ शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड ” या संस्थेची स्थापना दि. ३ जून १९५६ रोजी सरकार दरबारी नोंदणी करण्यात आली. त्यानंतर पूर्वेकडील वर्ग या मंडळाच्या छत्राखाली आले आणि “ उत्कर्ष मंदिर ” या शाळेचा संस्थेचा नावे शुभारंभ झाला.

श्री.वी.वी.कोठारे यांनी मामलेदारवाडी मालाड पश्चिम येथील त्यांच्या मालकीचा भूखंड संस्थेला दिला. त्यावर एक पत्र्याची शेड उभारून त्यात खोल्या पाडून शाळेचे वर्ग तेथे भरू लागले आणि १९५८ साली शाळेला सरकारची मान्यता मिळाली.

तेव्हापासून ते आतापर्यंतच्या काळात शिक्षण प्रसारक मंडळासाठी काम करणाऱ्या अनेक कार्यकत्याच्या तन,मन,धन पूर्वक केलेल्या परिश्रमामुळे आपण आजपर्यंतचा उत्कर्ष पाहत आहोत. पन्नास विदयार्थीपासून सुरु झालेल्या शाळेत आज जवळ जवळ ३००० विदयार्थी शिक्षण घेत आहेत. पत्र्याच्या शेडपासून ते आज अस्तित्वात असलेल्या पूर्व व पश्चिमकडील दोन मोठ्या इमारती व खेळाची मैदाने येथपर्यंत शाळेचा विस्तार झालेला आहे. बालमंदिर ते शालांत परीक्षेपर्यंत विदयार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय संगणक वर्ग (MSCIT), लोकसेवा स्पर्धा परीक्षा (UPSC, MPSC) आदीसाठी मार्गदर्शनवर वर्ग पण संथेतर्फे घेतले जात आहेत.

उत्तम शिक्षणाच्या कार्यामध्ये शाळेतील शिक्षकांचा सहभाग खूपच मोलाचा व महत्वाचा असतो. सुदैवाने आपल्या शाळेला पूर्वीपासूनच चांगले सुशिक्षित, मनमिळाऊ, विदयार्थीप्रिय, मुख्याध्यापक, शिक्षक व अन्य कर्मचारी लाभलेले आहेत. आपली संस्था सर्व शिक्षक शिक्षकांना आपल्या गुणवत्ता वाढीसाठी व सर्वकष प्रगतीसाठी प्रोत्साहन देत असते. गतकाळात आपल्या शिक्षकांना राज्यपुरस्कार, महापौर पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी गौरवीत केलेले आहे.

शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यामध्ये शाळेतील शिक्षकांचा सहभाग खूपच मोलाचा व महत्वाचा असतो. सुदैवाने आपल्या शाळेला पूर्वीपासूनच चांगले सुशिक्षित, मनमिळाऊ, विद्यार्थीप्रिय, मुख्याध्यापिका शिक्षक व अन्य कर्मचारी लाभलेले आहेत. आपली संस्था सर्व शिक्षकांना आपल्या गुणवत्ता वाढीसाठी व सर्वकष प्रगतीसाठी प्रोत्साहन देत असते. गत काळात आपल्या शिक्षकांना राज्य पुरस्कार, महापौर  पुरस्कार या सारख्या पुरस्कारांनी गौरवीत केलेले आहे.

शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याचा प्रमुख केंद्र बिंदू म्हणजे शाळेतील विदयार्थी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक विकास घडविणे व सुसंपन्न व्यक्तिमत्वाचे देशभक्त नागरिक निर्माण करणे. हे उदिष्ट ठेऊन संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षकगण आणि अन्य कर्मचारी कार्यरत असतात. विद्यार्थीच्या सर्वागीण विकासासाठी पुस्तकी शिक्षणाबरोबरच संगणक प्रशिक्षण, विविध खेळामधील क्रीडा नैपुण्य आणि नृत्य, नाट्य वक्तृत्व आदि कला नैपुण्य यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे सहभाग घेऊन त्यामध्ये कुशलता प्राप्त करण्यासाठी व विध्यार्थीना उत्तेजन, मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक संधी देण्यात येतात. यामुळेच आज आपल्या शाळेत शिक्षण घेतलेले असंख्य विदयार्थी केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असून आपल्या कार्याचा उपयोग समाज उन्नतीसाठी करीत आहेत.

इ.स.१९५६ मध्ये लावलेला एका लहान बीजांकुराचा आज मोठा फोफावलेला वटवृक्ष झाला आहे या विकास वृद्धीसाठी संस्थेचे असंख्य कार्यकर्ते आजी-माजी शिक्षक व अन्य कर्मचारीगण आजपर्यंत शिक्षण घेतलेले विदयार्थी तसेच संस्थेला उदार हस्ते आर्थिक मदत देणारे देणगीदार व जाहिरातदार आणि अनंत हस्ते मदत करणारा आपला समाज या सर्वांचा हातभार लागलेला आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आजपर्यंतची वाटचाल सुलभ होऊ शकली आहे. अजून बराच प्रवास पुढे करावयाचा आहे. सुशिक्षित सुसंस्कृत, सुजाण, सुज्ञ आणि देशभक्त नागरिक निर्माण करण्यासाठी आपला खारीचा वाट उचलायचा आहे. या कार्यसिद्धीसाठी सर्व संबधीताचा आशीर्वाद मिळेल अशी पूर्ण खात्री आहे.

 

श्री.श.श्री.अणकईकर

अध्यक्ष

शिक्षण प्रसारक मंडळ, मंडळ