उपक्रम


 

               पायाभूत सुविधा देण्यात मंडळ अग्रेसर राहिले आहे. पूर्व-पश्चिम अशी दोन्हीकडची सभागृहे गेल्या दोन वर्षात उत्कृष्ट व सुसज्ज तसेच वातानुकुलित करण्यात आली आहेत. दोन्ही इमारतीमध्ये प्रत्येकी चार ई-क्लास रूम्स, दोन्ही ठिकाणी प्रत्येकी १ दृक्श्राव्य कक्ष तर आहेच शिवाय यंदा संगणक कक्षांचे आधूनिकीकरण करण्यात आले आहे. नवीन, संगणक, नवीन बैठक व्यवस्था आली आहे.

 

अध्यापनासाठी सेमी इंग्लिशचा वापर करण्यात आला आहे व इ.५वी पासून गणित व विज्ञान हे विषय पूर्व व पश्चिम दोन्ही विभागांत प्रत्येकी एका वर्गात इग्रंजीमधून शिकविण्यात येतात. याशिवाय प्राथमिकमधेही दोन्ही ठिकाणी सर्व वर्गामध्ये गणित विषय इ.१ली पासून इग्रंजीमध्ये शिकविण्यास वर्ष २०१२-१३ च्या दुसऱ्या सत्रापासून सुरुवात करण्यात आली आहे.

प्राथमिक तसेच माध्यमिक दोन्ही शाळांत पूर्व-पश्चिम दोन्ही विभागात विद्यार्थीना समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली असून या विषयातील अनेक समस्या सोडविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. पूर्व विभागात प्राथमिक विभागाच्या पुढाकाराने ‘अल्कोहोलिक अनोनिमस’ या संस्थेमार्फत व्यसनमुक्ती केंद्र सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक रविवारी पूर्व शाळेत सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पालकांसाठी व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाचे काम केले जाते.

विद्यार्थ्यांना त्यांचा मानसिक कल कसा आहे हे कळावे म्हणून इ.९वीतील सर्व विदयार्थ्यांची मानसिक कल चाचणी (Aptitude Test) समुपदेशक श्रीम.गायत्री प्रभू यांनी घेतली व त्या चाचणीचा अहवाल प्रत्येक विद्यार्थ्यांस देण्यात आला. तसेच विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शनही करण्यात आले.

गेल्या २-३ वर्षात बालमंदिर विभागाने अडीच वर्षांच्या मुलांसाठी खेळवर्ग (Aptitude Test) चालू केला आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी सहल असा उपक्रम उत्साहाने राबविला आहे. यंदा तर बालमंदिरातील सर्व विदयार्थ्यांना सहलीला न्यायची योजना होती. परंतु ३५४ पैकी २०४ मुलांच्या पालकांनी परवानगी दिली. पूढील वर्षी ही संख्या वाढावी अशी अपेक्षा आहे. उत्कर्ष वह्या वितरणाचे कामही बालमंदिर विभागाने समर्थपणे पेलले आहे. अन्य शिक्षक व शिक्षकेतर यांनी त्यांस चांगली साथ दिली आहे.

ऑगस्ट २०१३ मध्ये डोंबिवली येथील श्री.विनोद देशपांडे, इंजीनीयर, यांचे सहकार्याने व ते संचालक असलेल्या आय.ए.एस.अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्कर्ष मंदिर ध्रुव आय.ए.एस.अकॅडमी’ कार्यान्वित करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र  लोकसेवा आयोग (MPSC) तसेच बँकिंगच्या (IBPS) च्या स्पर्धा परिक्षाबाबत मार्गदर्शनाचे काम या अकॅडमीद्वारे केले जात आहे. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी याचा मोठा लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे. उपनगरातील एक विश्वासार्ह प्रशिक्षण केंद्र म्हणून काम करून महाराष्ट्राचा (UPSC), (MPSC), बँकिंग व स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग वाढवावा अशी मंडळाची अपेक्षा व नम्र प्रयत्न या उपक्रमांमध्ये आहे.

याशिवाय मंडळातर्फे MS-CIT चे वर्गही पश्चिमेकडील इमारतीत चालविले जातात. शिक्षण प्रसारक मंडळ हे MS-CIT या कोर्ससाठी अधिकृत केंद्र आहे व विद्यार्थ्यांनी तसेच पालक व समाजातील अन्य व्यक्तींनी या केंद्रातील प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संगणकीय साक्षरता वाढविण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती.

‘उत्कर्ष वार्षिक’ ‘छात्रबोधिनी’ तसेच ‘उत्कर्ष वह्या’ या सर्वावर उत्कर्ष मंदिर म्हणून छाप निर्माण करण्याचा प्रयत्न मंडळाने गेली काही वर्ष सलगपणे केला आहे. मराठी शाळाही प्रकाशनामध्ये मागे नाहीत-नसाव्यात असे आम्हांस वाटते. या प्रकाशनामध्ये नवरूपासाठी कार्यकारिणी सदस्य, माजी विद्यार्थी व चित्रकार व उद्योजक श्री.आशुतोष केळकर यांनी विशेष योगदान दिले आहे.

‘उत्कर्ष मंदिर’ ही चिन्ह खुण (logo) असलेल्या वह्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात देण्याची योजना यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबविण्यात येत आहे.