Shikshan Prasarak Mandal, Malad has been conducting Utkarsha Mandir High School for educational & socio-economic enhancernent of the students of Malad East and West
Shikshan Prasarak Mandal, Malad has been conducting Utkarsha Mandir High School for educational & socio-economic enhancernent of the students of Malad East and West
Shikshan Prasarak Mandal, Malad has been conducting Utkarsha Mandir High School for educational & socio-economic enhancernent of the students of Malad East and West
Shikshan Prasarak Mandal, Malad has been conducting Utkarsha Mandir High School for educational & socio-economic enhancernent of the students of Malad East and West
मालाडमधील सर्वोत्तम प्रारंभिक शिक्षण ( प्रीस्कूल ) | उत्कर्ष मंदिर
येथे प्रेमळ वातावरण, संस्कारमूल्ये आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांच्या संगमातून, प्रत्येक लहानग्याच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी नियोजित उपक्रम राबवून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करतो..
अंगणवाडी (Nursery ) | बालवर्ग Jr. KG) | शिशुवर्ग (Sr. KG)
कृतिसंगम शिक्षण
रंगांची ओळख आणि क्रॅयॉन्सने मुक्त चित्रकला
संख्याज्ञान
१ ते २० अंक ओळखणे. या संकल्पना समजून घेणे
भाषा विकास
मुळाक्षरे आणि वर्णमालेतील अक्षरे केवळ ओळखणे
पर्यावरण अभ्यासु
सभोवतालच्या परिसराविषयी सविस्तर माहिती
पंचकोश विकास
मानसिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी
सामान्य ज्ञान
स्वतःची ओळख, शरीराचे भाग, आणि मूलभूत सवयी
प्रत्येक टप्प्यावर शिक्षणातील उत्कृष्टतेची जपणूक
आम्ही प्रत्येक इयत्तेत ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वासाचा सातत्यपूर्ण विकास घडवतो, त्याची माहिती खालीलप्रमाणे :
बालवर्ग ( 2 ते 3 वयोगट )
हा वर्ग औपचारिक शिक्षणाची पहिली पायरी असून मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करण्यावर भर दिला जातो. खेळातून शिकण्याच्या पद्धतीद्वारे अक्षर- अंकओळख व मूलभूत संकल्पना समजावल्या जातात आणि विविध उपक्रमांतून त्यांच्या भाषिक, सामाजिक व सर्जनशील विकासासोबत आत्मविश्वासाचीही जपणूक केली जाते.
भाषा विकास: अक्षरांची ओळख (A-Z आणि मुळाक्षरे), सोपे शब्द, आणि यमक जुळणाऱ्या कविता (Rhymes)
संख्याज्ञान: १ ते २० पर्यंतचे अंक ओळखणे, मोजणी करणे आणि आकार (Shapes) व रंगांची ओळख
लेखन पूर्व कौशल्ये: सरळ रेषा (Standing lines), आडव्या रेषा (Sleeping lines) आणि वळणे (Curves) काढण्याचा सराव
सामान्य ज्ञान: स्वतःची ओळख, शरीराचे भाग, फळे, प्राणी आणि मूलभूत सवयी
शिशुवर्ग बालवर्ग ( 4 ते 5 वयोगट )
या वर्गात मुलांना पहिलीच्या (Grade 1) अभ्यासक्रमासाठी तयार केले जाते. अभ्यासक्रम थोडा अधिक विस्तृत असतो.
या टप्प्यावर वाचन-लेखनाची पायाभरणी अधिक मजबूत केली जाते तसेच गणितातील मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या जातात. कृतीआधारित आणि सहभागात्मक शिक्षण पद्धतीद्वारे मुलांचा तर्कशक्ती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवला जातो. शिस्त, स्वावलंबन आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करून पुढील शैक्षणिक प्रवासासाठी त्यांना सज्ज केले जाते
पर्यावरण अभ्यासु: ऋतू, वाहतुकीची साधने, झाडे-पालेभाज्या आणि आपल्या परिसराची अधिक सखोल माहिती
भाषा कौशल्ये: दोन आणि तीन अक्षरी शब्द वाचणे व लिहिणे, सोपी वाक्ये तयार करणे. मराठीत काना, मात्रा, वेलांटीची प्राथमिक ओळख
गणित: १ ते १०० पर्यंतचे अंक, 'आधी' आणि 'नंतर' येणारे अंक, लहान-मोठी संख्या आणि बेरीज-वजाबाकीची प्राथमिक संकल्पना
सामाजिक विकास: गटात काम करणे, संवाद कौशल्ये आणि शिस्त विकसित करण्यावर भर
कौशल्य विकास: कात्रीने कागद कापणे, मणी ओवणे आणि कथा सांगण्याचे कौशल्य विकसित करणे
नवीन अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये (SCF-FS 2024)
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 'राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४' नुसार काही महत्त्वाचे बदल झाले आहेत:
कृतिसंगम शिक्षण: पाठांतराऐवजी चित्रकला, मातीकाम, आणि खेळांतून संकल्पना स्पष्ट केल्या जातात
पंचकोश विकास: मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सर्वांगीण विकासासाठी 'पंचकोश' संकल्पनेचा अंतर्भाव अभ्यासक्रमात केला आहे
मराठी अनिवार्य: २०२५-२६ पासून राज्यातील सर्व बोर्डांच्या (CBSE, ICSE सह) शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य असेल आणि त्याचे मूल्यमापन 'गुणांच्या' आधारावर केले जाईल
पुस्तकांच्या पलीकडे, अनुभवातून घडणारे शिक्षण
उत्कर्ष मंदिरच्या प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांना भक्कम शैक्षणिक पाया देतानाच स्वयंचिंतन, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आणि सर्जनशील दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला जातो. शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता क्रीडा, कला, हस्तकला, प्रकल्पाधारित उपक्रम आणि विविध सहशालेय क्रियांद्वारे अनुभवाधारित बनवले जाते. या सर्व माध्यमांतून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक विकास संतुलित पद्धतीने घडवला जातो.