Shikshan Prasarak Mandal, Malad has been conducting Utkarsha Mandir High School for educational & socio-economic enhancernent of the students of Malad East and West
Shikshan Prasarak Mandal, Malad has been conducting Utkarsha Mandir High School for educational & socio-economic enhancernent of the students of Malad East and West
Shikshan Prasarak Mandal, Malad has been conducting Utkarsha Mandir High School for educational & socio-economic enhancernent of the students of Malad East and West
Shikshan Prasarak Mandal, Malad has been conducting Utkarsha Mandir High School for educational & socio-economic enhancernent of the students of Malad East and West
या स्तरावर विद्यार्थ्यांना विविध विषयांमधील संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी अनुभवाधारित आणि संवादात्मक शिक्षणपद्धतीचा अवलंब केला जातो. यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने विचार करायला, प्रश्न विचारायला आणि समस्यांचे समाधान शोधायला शिकतात.
विचारशक्ती, स्वावलंबन आणि कौशल्य विकासाचा महत्त्वाचा टप्पा
विद्यार्थी नेतृत्व आणि सहभाग
विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी दिली जाते, ज्यामुळे नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित होतो.
चिकित्सक आणि विश्लेषणात्मक विचार
विविध चर्चासत्रे, प्रकल्प आणि उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची विचारशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवली जाते.
संघभावना आणि सहयोगी शिक्षण
गटप्रकल्प आणि चर्चांद्वारे विद्यार्थ्यांना एकत्र काम करण्याची आणि कल्पना मांडण्याची संधी दिली जाते.
कौशल्य विकासावर भर
शैक्षणिक अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा आणि विविध सहशालेय उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो
प्रत्येक टप्प्यावर शिक्षणातील उत्कृष्टतेची जपणूक
आम्ही प्रत्येक इयत्तेत ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वासाचा सातत्यपूर्ण विकास घडवतो, त्याची माहिती खालीलप्रमाणे :
इयत्ता ६ वी ते ८ वी ( माध्यमिक )
इयत्ता सहावी (6th Standard)
टप्पा प्राथमिक शिक्षणाकडून माध्यमिक शिक्षणाकडे जाणारा महत्त्वाचा दुवा आहे.
मराठी/इंग्रजी/हिंदी: जोडाक्षरे, शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम इ.), उतारा वाचन आणि साध्या कविता
गणित: पूर्णांक संख्या, अपूर्णांक, कोन आणि त्रिकोण, भूमितीय रचनांची ओळख.
इतिहास व नागरिकशास्त्र: प्राचीन भारत, हडप्पा संस्कृती, जनपदे आणि आपली स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगर पालिका)
भूगोल: पृथ्वीची फिरणे, अक्षवृत्त व रेखावृत्त, नकाशा वाचन आणि हवामान
इयत्ता सातवी (7th Standard)
या इयत्तेत संकल्पना अधिक विस्तारतात
भाषा: संस्कृत, व्याकरण (काळ, प्रयोग), पत्रलेखन, कथालेखन आणि निबंध.
गणित: बीजगणित (Algebra) ची सुरुवात, समीकरणे, मसावि-लसावि, बँकिंग आणि व्याज, वर्तुळ
विज्ञान: वनस्पतींची रचना, आपत्ती व्यवस्थापन, उष्णता, ध्वनी, अन्नातील घटक
इतिहास व नागरिकशास्त्र: मध्ययुगीन भारत, शिवपूर्वकालीन भारत, स्वराज्य स्थापना आणि संविधानाची ओळख
भूगोल: सूर्याची भासमान हालचाल, खडक आणि खडकांचे प्रकार, भरती-ओहोटी, वारे.
इयत्ता आठवी (8th Standard)
हा इयत्ता ९ वी आणि १० वी च्या पायाभरणीचा वर्ष मानला जातो.
भाषा: प्रगत व्याकरण (संधी, अलंकार), सारांश लेखन आणि वृत्तांत लेखन.
गणित: विस्तार सूत्रे (Expansion Formulae), घातांक, समांतर रेषा व छेदिका, चौकोन रचना आणि क्षेत्रफळ.
विज्ञान: अणूची संरचना, बदल आणि रासायनिक अभिक्रिया, मानवी शरीर व इंद्रिय संस्था (श्वसन व रक्ताभिसरण), प्रदूषण.
इतिहास व नागरिकशास्त्र: आधुनिक भारत, १८५७ चा स्वातंत्र्यलढा, भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि आपली न्यायमंडळ (Sovereign Judiciary).
भूगोल: पृथ्वीचे अंतरंग, आर्द्रता व ढग, सागरतळ रचना आणि लोकसंख्या
संगणक व तंत्रज्ञानाचे ज्ञान
येथे विद्यार्थी संगणकाचा वापर अभ्यासासाठी आणि निर्मितीसाठी करायला लागतात.
डेस्कटॉप गेम्स आणि कोडी (Puzzles): साधी 'ड्रॅग अँड ड्रॉप' (Drag & Drop) कोडी सोडवून मुले लॉजिक आणि माऊसचे बटण दाबण्याची पद्धत शिकतात.
सायबर सुरक्षा: इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी आणि 'पासवर्ड' सुरक्षित कसा ठेवावा, याची प्राथमिक माहिती.
फाईल मॅनेजमेंट: फोल्डर तयार करणे, फाईल 'सेव्ह' (Save) करणे आणि ती शोधणे.
MS Office चा वापर:
MS Word: निबंध लिहिणे, तक्ते (Tables) तयार करणे आणि फॉन्ट बदलणे.
MS PowerPoint: शालेय प्रकल्पांसाठी स्लाईड्स बनवणे, त्यात चित्रे आणि ॲनिमेशन टाकणे.
MS Excel: साधे तक्ते बनवणे आणि बेरीज-वजाबाकीची सूत्रे वापरणे.
अभ्यासक्रमाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
हा इयत्ता ९ वी आणि १० वी च्या पायाभरणीचा वर्ष मानला जातो.
स्वयंअध्ययन: विद्यार्थ्यांना प्रकल्प (Projects) आणि उपक्रम (Activities) दिले जातात.
प्रात्यक्षिक: विज्ञानासाठी प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो
मूल्यमापन: आकारिक (Formative) आणि संकलित (Summative) अशा दोन पद्धतींनी परीक्षा घेतली जाते.
पुस्तकांच्या पलीकडे, अनुभवातून घडणारे शिक्षण
उत्कर्ष मंदिरच्या प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांना भक्कम शैक्षणिक पाया देतानाच स्वयंचिंतन, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आणि सर्जनशील दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला जातो. शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता क्रीडा, कला, हस्तकला, प्रकल्पाधारित उपक्रम आणि विविध सहशालेय क्रियांद्वारे अनुभवाधारित बनवले जाते. या सर्व माध्यमांतून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक विकास संतुलित पद्धतीने घडवला जातो.
वर्गखोल्यांपलीकडील शिक्षण
शिक्षण केवळ वर्गखोल्यांमध्ये मर्यादित नसून विविध सहशालेय उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
प्रकल्पाधारित शिक्षण
विविध विषयांशी संबंधित प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना संकल्पना समजून घेणे आणि त्यांचा प्रत्यक्ष उपयोग करणे शिकवले जाते.
विद्यार्थी नेतृत्व उपक्रम
विद्यार्थी सभा, निवडणुका आणि गटक्रियाकलापांद्वारे विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण आणि जबाबदारीची जाणीव विकसित करण्याची संधी मिळते.
तंत्रज्ञानाधारित शिक्षण
डिजिटल साधने आणि संगणकाच्या वापराद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिकण्याची आणि सर्जनशीलता वाढवण्याची संधी दिली जाते.